ओरिसा
ओरिसा : भारताचे पूर्व किनाऱ्यावरील घटक राज्य. उ. अ. १७ ̊ ४८’ ते २२ ̊ ३४’ आणि पूर्व रे. ८१ ̊ ४२’ ते ८७ ̊ २९’. क्षेत्रफळ १, ५५, ७८२ चौ. किमी.; लोकसंख्या २,१९, ४४, ६१५ (१९७१). ओरिसाच्या उत्तरेस बिहार, पश्चिमेस मध्य प्रदेश, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पूर्वेस बंगालचा उपसागर व ईशान्येस पश्चिम बंगाल आहेत. राज्याची राजधानी भुवनेश्वर ही आहे.